Monday, 7 August 2017

बहिण

         

                 *।।बहिण।।*
             〰〰?〰〰
        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
 तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
❄रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❄

Wednesday, 26 July 2017

कारगील विजय दिवस

कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारत के लिये एक महत्वपूर्ण दिवस है। इसे हर साल 26 जुलाई को मनाया जाता है। कारगिल युद्ध लगभग 60 दिनों तक चला और 26 जुलाई को उसका अंत हुआ। इसमें भारत की विजय हुई। इस दिन कारगिल युद्ध में शहीद हुए जवानों के सम्मान हेतु मनाया जाता है।
   1971 के भारत-पाक युद्ध के बाद भी कई सैन्य संघर्ष होता रहा। दोनों देशों द्वारा परमाणु परीक्षण के कारण तनाव और बढ़ गया था। स्थिति को शांत करने के लिए दोनों देशों ने फरवरी 1999 में लाहौर में घोषणा पत्र पर हस्ताक्षर किए। जिसमें कश्मीर मुद्दे को द्विपक्षीय वार्ता द्वारा शांतिपूर्ण ढंग से हल करने का वादा किया गया था। लेकिन पाकिस्तान ने अपने सैनिकों और अर्ध-सैनिक बलों को छिपाकर नियंत्रण रेखा के पार भेजने लगा और इस घुसपैठ का नाम "ऑपरेशन बद्र" रखा था। इसका मुख्य उद्देश्य कश्मीर और लद्दाख के बीच की कड़ी को तोड़ना और भारतीय सेना को सियाचिन ग्लेशियर से हटाना था। पाकिस्तान यह भी मानता है कि इस क्षेत्र में किसी भी प्रकार के तनाव से कश्मीर मुद्दे को अंतरराष्ट्रीय मुद्दा बनाने में मदद मिलेगी।
प्रारम्भ में इसे घुसपैठ मान लिया था और दावा किया गया कि इन्हें कुछ ही दिनों में बाहर कर दिया जाएगा। लेकिन नियंत्रण रेखा में खोज के बाद और इन घुसपैठियों के नियोजित रणनीति में अंतर का पता चलने के बाद भारतीय सेना को अहसास हो गया कि हमले की योजना बहुत बड़े पैमाने पर किया गया है। इसके बाद भारत सरकार ने ऑपरेशन विजय नाम से 2,00,000 सैनिकों को भेजा। यह युद्ध आधिकारिक रूप से 26 जुलाई 1999 को समाप्त हुआ। इस युद्ध के दौरान 527 सैनिकों ने अपने जीवन का बलिदान दिया।

Wednesday, 14 June 2017

स्कूल चले हमस्कूल चले हम

स्कूल चले हमस्कूल चले हम

सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा

झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा

कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे

देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे

सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या

भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे

सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी

      समस्त शिक्षक

सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा

झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा

कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे

देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे

सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या

भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे

सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी

      समस्त शिक्षक

Monday, 12 June 2017

*येतील चिमण पाखरं'*

*येतील चिमण पाखरं'*

26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट    घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।

Tuesday, 6 June 2017

छत्रपती शिवाजी महाराज की जय !

#‎अवघा‬ "मराठा छत्रपती" झाला

#6 जून 1674 पाच सुलतानी सत्तेच्या छाताडावरती पाय देऊन माझा राजा छत्रपती झाला......

दरबार सज्ज झालाय थोरल्या..
धन्याच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी..

#६_जून.
#शिवराजाभिषेकदिन
#किल्ले_रायगड
# जय जिजाऊ
#जय शिवराय
#जय शंभूराजे

Friday, 2 June 2017

संघर्षकारी लोकनेत्यास विनम्र अभिवादन





देवा........!
            जीवनात सर्वस्व आहात तुम्ही.....!
😭 😭

        3 जून 2014 रोजी दिवस उजाडला आणि असंख्य सामान्य लोकांच्या व हिंदुस्थान चा सूर्य मावळला......!
                     साहेब आजचा दिवस आयुष्यात आला आणि पूर्ण आयुष्यचं इथं थांबलं हृदय धडकत आहे पण ते त्या दिवसापासून मेलेलंच आहे.....!
                        साहेब 3 जून 2014 ते 3 जून 2017 या काळातील असा एकही दिवस नाही की जो आपला आशिर्वाद घेतल्याशिवाय दिवस गेला नाही आणि या शरीरात जो पर्यंत प्राण आहेत तोपर्यंत देखील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या नावाचाच जप करतील....!
                    साहेब नेहमी आपल्या आठवणीत स्वप्न रंगायची भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलोत तरी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे आहेत हीच ओळख आम्हाला पूर्ण आयुष्य मिळाली साहेब भारताच्या इतिहासात आपलं जे स्थान आहे ते छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर,यांच्या पंक्तीत व असंख्य सामान्य मागासलेल्या दिनदुबळ्या कष्टकरी शेतमजुरांच्या हृदयात देवाचं स्थान निर्माण केलं साहेब तुम्ही आमच्यात नाहीत हे हृदय कधीच मान्य करायला तयार नाही.......!
           प्रत्येक मंदिरात गेलो तरी त्या प्रत्येक देवात फक्त एकच देव दिसतो आणि ते म्हणजे आमचे लाडके साहेब...........!
               साहेब असंख्य सामान्य लोकांच्या घरात तुम्हाला शान शोकाच्या कोणत्या गोष्टी दिसायच्या नाहीत संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची देखील टंचाई दिसेल साहेब एवढंच नाही पोट भरण्यासाठी लागणारं अन्न - पाणी देखील एक वेळेस दिसायचं नाही पण त्या घरांमध्ये आणि प्रत्येक घरांच्या देवघरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या ( देवाचा ) फोटो नक्की पहायला मिळेल....!
                                                                      साहेब आपल्या आठवणीत प्रत्येक दिवशी डोळ्यात अश्रू येणं आणि अंतःकरणाला चिरून टाकणाऱ्या आपल्या आठवणी नेहमीच पावलोपावली हृदयात घर करून गेल्या....!
                             .............

साहेब.....
             काय केला गुन्हा आम्ही
              कश्याची दिलीत सजा ......!
             बुद्धिबळाच्या पटावरून
          आमचा राजाच झालाय वजा...!
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

        लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना ( देवाला ) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन .....!
                     😭💐💐💐💐💐💐💐💐💐सदैव स्मरनाथीॅ -
 तालुका अध्यक्ष स्वाभिमानी प्रबोधनी शिरूर कासार 💐😭

Tuesday, 30 May 2017

🌻🌼🌻🌼🌻🌼🌼

   *पुण्यश्लोक राजमाता*
          *महाराणी*
   *अहिल्यादेवी होळकर*
             *यांच्या*
*२९२ व्या जयंतीनिमित्त*
     *विनम्र अभिवादन!!*

🌼🌻🌼  🌼🌻🌼

Saturday, 13 May 2017

१४ में संभाजी राजे जयंती

मरणाला घाबरणारे खुप बघीतले,
मरणाला न घाबरणारेही खुप बघीतले,
 पण....
मरणालाच घाबरवणारा एकच बगीतलाय
*राजा शंभु छञपती*
१४ में संभाजी राजे जयंती
हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना त्रिवार
*मानाचा मुजरा*

Wednesday, 10 May 2017

🌺🍃   बुद्ध पौर्णिमा 🍃🌺

        आज बुधवार, दि. १० मे, २०१७ रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा मे महिन्यात येते. या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला.
     महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात केले आहे. ते लिहितात : "पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, "माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते." "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. "सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.
     लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणा-या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वा-याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली, आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
      शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.
       पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५ व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरूवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला. सिद्धार्थ गौतमास वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंधःकार पूर्णपणे दूर झाला व तो सम्यक संबुद्ध झाला. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली. "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
      याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वाटीकेत महापरिनिर्वाण झाले.
      या पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी मनाच्या जागरूक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचा मृत्यू झाला
      गौतम बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्वप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात.
      अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे.
     सणांच्या दिवशी मंगल, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची स्मृती जपण्यासाठी सण साजरे केले जातात. सणांच्या दिवशीच्या भूतकाळातील घडामोडींपासून बोध घेऊन त्यानुसार स्वतःचे जीवन घडविण्यासाठी सण साजरे केले जातात.
      बुद्धाने आयुष्यभर शील, समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकविला. त्याने करूणा विकसित करण्याचा व समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला.
     सर्व बारा पौर्णिमा बौद्धांचे सण आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. बुद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळे असे महत्व आहे. या सर्व दिवशी उपोसथ म्हणजेच अष्टशीलाचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. जेव्हा आपण प्रसन्नतेने अष्टशीलाचे पालन करतो, तेव्हा भूतकाळात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना शील व समाधीचा जास्तीत जास्त धैर्याने अभ्यास करण्याची प्रेरणा  आपल्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व समजून घेणे आवश्यक आहे.

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचरणाने,
लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते.
      - तथागत  भगवान गौतम बुद्ध
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

 *सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगल सदिच्छा !!!*
"सर्वांचे कल्याण होवो."
💐💐🙏🙏🙏💐💐
🌺🌺🌺जयहिंद🌺🌺🌺
*💐अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा,शांती ची शिकवण देणारे, विश्व वंदनीय महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त*💐
*२५६१ व्या बुध्द पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय हार्दिक सदिच्छा*....!!💐