सरांना पालकाचे पत्र

प्रिय गुरुजी,
राम! राम!
     माजे तुमच्याकड लेकरं शिकायल हायत. गुरुजी ध्यानान शिकवा त्यासनी. तुमचे लेकरं समजून. माझा पाेरीला माेठ माेठ लिहायला येत. पर वाचायला नाय येतं. शिकवा गुरुजी तेवढं. तुमी मला शबद दिलतं एका सालात वाचलं, पर अजून अक्षर बी फाेडत नाय. तुमी काय देव नाय पर करा येवढं गरीबासाठी. तुमचं लेकरू समजून. बर पाेरग बरायं पर शेजारचा नाम्या म्हणताे गणितात कच्च हाय. अनं हे बी म्हणताे, "तुमाला घाला म्हणटलताे दुसऱ्या शाळतं" तिथली राेज गाडी येते न्हायला.  पर तुमच्या खातिर ठेवलाव राव!  बघा तेवढं, शिकवा तुमच लेकरू समजून. गावची शाळा कस एेकताय करा त्याला स्टारट.गुरूजी घरी संडास बांधल बर का. तुमहासबी माहीती रहावं काेणती याेजना आली तर.
          बरं गुरुजी हे सांगा यंदा पाेराला शाळेत डरेस नाय मिळणार?  खात काढा मन बँकेंत. आव गुरुजी हि उपाताप कशाला लावलाव माग. आपल्या गावात सरकारी बँक नाय मग तालुक्याला जाऊन काढायचं दाेन दिसाचा राेजगार बुडवायचं, आमच्या पैशान डरेस घ्याचं पावती देवून मग पैका जमा. कस व गुरुजी अस.  पैलचं आमचं पाेट हातावर.काय मार्ग निघतं का बगा गरीबासाठी, तुमचं लेकरू समजून.
              गुरुजी लेकरासनी हे बी शिकवा समाजात कस रहाव,घरात कस वागावं,व्यैवहार कस करावं. अनं माजाकून एक फुल परवानगी तुम्हाला लेकराला मारा पर शिकवा. तुमी काय त्याच  दुश्मन हाव का. त्याच्या भलासाठीच की, तुमचं लेकरू समजून मारा.गुरुजी एक ईसरलाेच सांगायचं शाळतं कायबी ईकायला येऊ देवू नका.  हि कारटे नुसत बाेंबलतात घरी कायबी घ्याचं म्हणून. ईथं पिठाला मिठ लागत नाय. घ्या समजुन.
माजी एकच ईनंती गुरुजी तुमाला  शाळतं शाळा करू नका बरं. नायतर आमच्या गरीबाच्या लेकरावाच्या जीवनाची शाळा हाेऊन बसल.
            गुरूजी माज काय चुकल असल तर माफ करा. शबद धरून बसू नका. बरं घ्या एवढं पाेटात तुमचं लेकरू समजून.

                          तुमचा
                          अबक


*==========================*

*✍🙏🙏🙏✍

No comments:

Post a Comment